Arogya Rakshak Covid Yojana

(आरोग्य रक्षक कोविड योजना)

₹7.7 lakh of ₹20 lakh raised
मराठीमधून आवाहन :
कोरोनाच्या या भीषण आपदेत आपण आपली व आपल्या परिवारातील सर्वांची काळजी घेत असालच.
नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुर्दैवाने कोरोनाच्या ह्या दुसऱ्या लाटेत खेड्यापाड्यातील समाज जास्त संक्रमित झाला आहे. त्यातच औषधे व प्राणवायूच्या कमतरतेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. अशा ह्या बिकट प्रसंगी वनवासी कल्याण आश्रम आपल्या 1000 हुन अधिक आरोग्य रक्षकांसकट ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
वनवासी कल्याण आश्रम हे जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करणारे अग्रणी संघटन आहे. आपण सर्वच कल्याण आश्रम परिवाराचे प्रमुख सदस्य आहात. कल्याण आश्रम परिवाराचा केंद्रबिंदू आहे जनजाती समाज.
कल्याण आश्रमाच्या कामातील एक प्रमुख आयाम आहे आरोग्य रक्षक योजना. आपल्या गावी राहुन, शेती व मजुरी करणारा हा सामान्य युवक सतत गावाच्या आरोग्य रक्षणाचे असामान्य काम करत असतो, तेही काही मोबदला न घेता – जे आजच्या युगात असंभवनीय वाटतं. अशा या आरोग्य रक्षकांचा आम्हा सर्वाना अभिमान आहे.
कल्याण आश्रमाने आपल्या आरोग्यरक्षकांना ह्या नवीन विषाणूशी लढण्यासाठी सज्ज केलं आहे. हे आरोग्यरक्षक पाड्यांवर जाऊन आपल्या सर्व जनजाती बांधव व भगिनींची तपासणी करत आहेत, त्यांचे लसीकरणाबद्धल प्रबोधन करून त्यांना लस घेण्यासाठी प्रेरित करत आहेत व योग्य उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
ह्यासाठी आम्हाला गरज आहे ती प्रगत वैद्यकीय साधनांची – जसे की infrared thermometers, oximeters, sanitizers, PPE Kits, hand gloves, face masks, tablets, etc.. ह्या सर्व साधनांची किंमत प्रत्येक आरोग्यरक्षकामागे साधारणपणे रु.२०००/- आहे.
कल्याण आश्रमाने हे मदतकार्य उपलब्ध निधीतून आधीच सुरू केले आहे परंतु ह्या कार्याचा विस्तार करण्यासाठी कल्याण आश्रम आपल्या सर्वांना भरभरून मदतीचे आवाहन करीत आहे. आपले donation हे आयकर सवलतीसाठी पात्र असेल व तशी पावती आपल्याला आमच्याकडून पाठवण्यात येईल
धन्यवाद !
आपले विनीत,
डॉ. भरत केळकर (अध्यक्ष)
शरद शेळके (सचिव)
दिलीपभाई मेहता (कोषाध्यक्ष)
आपणास वरील सामुग्रीची वस्तूरूपी मदत करायची असेल तर कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा, ही विनंती
नाशिक : श्री. संजीव दापोरकर – +91 98601 80649
पुणे : श्री. प्रकाश खिचडे – +91 97300 07694
 
 

Donation Appeal in English :

Donate generously to support Covid Kit Expense of 1000 Arogya Rakshak (Health Guards) in Maharashtra
Background :
The 2nd wave of Covid has taken many by surprise in India. Unfortunately this time, the tribals in villages are affected more by the 2nd wave. The scarcity of medicines and oxygen has strained public health system like never before. Vanvasi Kalyan Ashram is already fighting this new challenge with its 1000+ Health Guards.
Kalyan Ashram has trained their Health Guards to fight with this new virus. These health workers are visiting villages (pada) to promote vaccination, to check the health of our tribal community and to guide them for proper medication.
For this purpose, we need sophisticated medical equipments like infrared thermometers, oximeters, sanitizer, hand gloves, PPE Kits, face masks, tablets, etc.. Cost of this kit per health guard is approx. Rs.2000/-.
We have already started the relief work from available funds however in order to expand its reach, Vanvasi Kalyan Ashram – working in tribal for tribal – sincerely request you to donate generously for this noble cause.
Your donation will be exempted from Income Tax as per applicable rules and a tax receipt will be sent to you in due course of time.
Yours truly,
Dr. Bharat Kelkar (President)
Shri. Sharad Shelke (Sachiv)
Shri. Dilipbhai Mehta (Treasurer)
If you wish to donate in kind, kindly contact the below mentioned office bearers.
Nashik – Shri. Sanjeev Daporkar – +91 98601 80649
Pune – Shri. Prakash Khichade – +91 97300 07694

 

Select Payment Method
Personal Info

Billing Details

Terms

Donation Total: ₹2,000.00

{amount} donation plus {fee_amount} to help cover fees.