Nagya Katkari sanskar varga 2nd anniversary

मोशी जवळ चिम्बली नावाचे छोटेसे गाव आहे. त्याच्या वेशीवर ...

मोशी जवळ चिम्बली नावाचे छोटेसे गाव आहे. त्याच्या वेशीवर एक छोटीशी वस्ती आहे. नदीच्या काठी वसलेली, छोट्या छोट्या झोपड्या असलेली….. आपल्या डोळ्यासमोर एखादं सुन्दर चित्र तयार होतय की काय?  नाही हो ! ही वस्ती सुन्दरतेच्या कुठल्याही परिभाषेत बसत नाही!
अठरा विश्व दारिद्र्य. आणि ओसाड माळरान, इतस्ततः पसरलेल्या जमेल ते वापरून बांधलेल्या झोपड्या, आणि अतिशय कळ्कट अवतारात फिरणारी मुलं…..
बापरे! एक भीषण औदासीन्याची परिस्थिती डोळ्यासमोर येते ना!
पण तसे नाहीच मुळी! त्या सर्व परिस्थितीत सुद्धा तिथे एक अवर्णनीय चैतन्य आहे. तिथली मुलं त्या चैतन्याचे जिवंत रूप आहे……
आणि आम्ही खरच भाग्यवान आहोत की आम्हाला वनवासी कल्याण आश्रमामुळे ही चिखलातली कमळ फुलताना बघण्याची, त्यांना ख़त पाणी घालण्याची संधी मिळाली “नाग्या कातकरी बाल संस्कार वर्ग” ह्या उपक्रमाच्या निमित्ताने…..
आता गुढी पाडव्याला आमचा दुसरा वाढदिवस आम्ही तुमच्याबरोबर साजरा करायचं ठरवलं आहे.
तुम्ही तुमच्या सर्व स्नेहींना घेऊन नक्की या!
आमची मुले तुमची वाट बघताहेत.
स्थळ -चिम्बली फाटा कात्कारी वस्ती
वेळ- सायं.6 वाजता
दिनांक-28 मार्च 2017

संपर्क
ऋषभ मुथा 9850258408
वैशाली जोशी 9552578197
अंजली घारपुरे  9604622628

Leave a Reply

*